महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Wardha Crime : क्रिकेट जुगार अड्ड्यावर धाड; 10 जणांवर गुन्हे दाखल - क्रिकेट जुगार अड्ड्यावर धाड

कारंजा शहरात क्रिकेट जुगार अड्ड्यावर धाड टाकून 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. एकाला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेनी ही कारवाई केली आहे. आरोपी हा हारजीतवर, विकेटवर, धावावर बोली लावून पैश्याची हारजीत लगवाडी असा क्रिकेट सामन्यावर जुगार खेळ होता.

Wardha Crime
जुगार अड्ड्यावर धाड 10 जणांवर गुन्हे दाखल

By

Published : Feb 2, 2023, 2:55 PM IST

वर्धा :सध्या वर्धा पोलीस गुन्हेगारांसाठी कर्दन काळ ठरत आहे. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी जिल्ह्याची सुत्रेहाती घेतल्यापासून पोलीसांनी प्रत्येक गुन्हेगाराला सळो की पळो करून सोडले आहे. जिल्ह्यात दारू विक्रेत्यांच्या तर नाकी नऊ आले असून गेल्या तीन महिन्यांत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. तसेच लाखोंच्या घरात तो नष्टही केला आहे. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कमालीच्या ऊर्जेने काम करत आहे. नुकतेच वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथे क्रिकेट सट्टाच्या अड्ड्यावर धाड टाकत लाखोंचा मुद्देमाल जप्त करून एकाच्या मुसक्या सुद्धा आवळल्या आहे. यामध्ये प्रामुख्याने स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी वाखाणण्याजोगी असून अनेक गुन्ह्यांचा छडा त्यांनी लावला आहे.


क्रिकेट सामन्यावर मोबाईलद्वारे हरजीतीचा खेळ : वर्ध्यातील कारंजा शहरात सायंकाळी भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामन्यावर मोबाईलद्वारे हरजीतीचा खेळ खेळताना अभिजित पेटकर याला अटक करण्यात आले आहे. त्याच्याकडून लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत 10 जणांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.


क्रिकेट जुगार खेळ : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखा वर्धाचे पथक आर्वी डिव्हिजन मधील कारंजा येथे रेड कारवाई करिता हजर असतांना मुखबिर द्वारे त्यांना खात्रीशीर खबर मिळाली. कारंजा येथे वॉर्ड क्रमांक 16 येथे राहणारा अभिजित पेटकर नावाचा इसम हा नुकत्याच सुरु असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट 20-20 मॅचवर पैशाचे हारजितचा लगवाडी व खायवाली असा क्रिकेट जुगार खेळ आहे. तो मोबाईल फोनद्वारे लोकांना बोलुन, सामन्याचे हारजितवर, विकेटवर, रनवर बोली लावुन पैशाचे हारजितचा लगवाडी व खायवाली असा क्रिकेट जुगार खेळ त्याच्या राहत्या घरी चालवित होता.

सामन्यावर पैशाची बोली :मिळालेल्या खबरेची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक आर्वी यांना देऊन झडती वारंट प्राप्त केले. खबरेप्रमाणे रेड केला असता यातील एक आरोपी हा अहमदाबाद क्रिकेट स्टेडीयम मध्ये भारत विरुध्द न्यूझीलंड या दोन्ही संघामध्ये सुरू असलेल्या सामन्यावर त्याचे राहत्या सापडला. तर बाकी ग्राहक आरोपी यांचा सोबत मोबाईल फोनद्वारे संपर्क करून क्रिकेट जुगार खेळ खेळत होते. यात मुख्य बुकी संजय उदापुरकर राहणार परतवाडा यांच्यासह योगेश इंगोले, धरमसिंग बावरी, माही विजय पिपला, रितू परवानी ,निकेश चावके, रिंकेश तेलहानी, राहुल भांगे, मिथुन बावरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा:Wardha Crime आचार संहितेचा कापूस व्यापाराला फटका ६५ लाख सापडल्याने पोलिसांनी घेतले ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details