महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#कोरोना : परदेशातून आलेल्या 'त्या' 45 प्रवाशांवर प्रशासनाची असणार नजर - वर्धा कोरोना

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून परदेशातून आलेल्या प्रवाशांची यादी सोमवारी जिल्हास्तरावर देण्यात आली. यामध्ये 45 प्रवासी कोरोना बाधित देशातून प्रवास करुन आलेले आहे. वर्धा जिल्ह्यात एकही रुग्ण कोरोना बाधित नाही त्यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी भीमनवार यांनी केले आहे.

Wardha Collector Vivek Bhimanwar
वर्धा जिल्हाधिकारी विवेक भीमनवार

By

Published : Mar 17, 2020, 1:47 PM IST

वर्धा - कोरोना बाधित देशातून प्रवास करुन आलेल्या 45 व्यक्तींची यादी प्राप्त होताच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या प्रवाशांवर 14 दिवस प्रशासनाकडून पाळत ठेवण्यात येणार असून अनेक उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांना देण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात एकही रुग्ण नसल्याने केवळ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हे पाऊले उचलले गेले असल्याने भीतीचे कोणतेही कारण नाही. तसेच नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी भीमनवार यांनी केले आहे.

वर्धा जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा...Coronavirus : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागपूरमध्ये जमावबंदी लागू

कलबुर्गी येथून वर्धा जिल्ह्यातील 6 विद्यार्थी परत आले आहेत. या व्यक्ती विविध तालुक्यातील आहेत. या व्यक्तींना त्या-त्या तालुक्यातील नियुक्त अधिकारी, कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन त्यांना घरीच 14 दिवस वेगळ्या खोलीत ठेवण्यासाठी कुटुंबियांना समजावून सांगतील. या सहा विद्यार्थ्यांची प्रकृती ठीकठाक आहे. तरी केवळ प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांच्या हातावर कोणत्या तारखेपर्यंत त्यांना घरी वेगळे राहावे लागेल याची तारीख शिक्का मारून नमूद केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

नागरिकांनी न ऐकल्यास सक्तीची उपाययोजना...

घरी क्वांरटाईन म्हणून राहायला सांगितलेल्या व्यक्तींनी शासनाचे आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे यापुढे अशा व्यक्ती घराबाहेर आढळून आल्यास जनतेने याची माहिती प्रशासनाला द्यावी. त्यांना सक्तीने शासनाने तयार केलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. अशा व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक गावात आणि शहरात प्रभागनिहाय नोडल कर्मचारी, पर्यवेक्षक आणि तालुका वैद्यकिय अधिकारी यांची नेमणूक केली आहे. ज्या गावात किंवा तालुक्यात कोरोना बाधित देशातून आलेल्या आहे. त्यांच्यावर नियुक्त प्रशासनाच्या अधिकाऱ्यांपासून लक्ष ठेवण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव होणार नाही यासाठी प्रशासन जनजागृती सोबतच सक्तीची उपाययोजना अमलात आणणार आहे.

हेह वाचा...कोरोनावर औषध शोधल्याचा ऑस्ट्रेलियातील संशोधकांचा दावा, अमेरिकेतही 'क्लिनिकल ट्रायल' सुरू

शाळा महाविद्यालये बंद ठेवा अन्यथा कारवाई होईल...

प्रशासनाने काल जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, बंद ठेवण्याचे आदेश काढलेत. मात्र काही शाळा आज सुरू असल्याचे लक्षात आले. अशा शाळा, महाविद्यालयाच्या व्यवस्थापकांनी तातडीने प्रशासनाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. अन्यथा अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र त्याचवेळी शिक्षक, प्राध्यापकांनी शाळा, महाविद्यालयात उपस्थित राहायचे आहे. त्यांच्या सेवा कधीही प्रशासन कोरोना उपाययोजनेसाठी घेऊ शकते. तसेच त्यांनी मुख्यालय न सोडण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

ठिकठिकाणी हात धुण्याची व्यवस्था...

जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र, सामुहिक सेवा केंद्र, इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षा केंद्र, बसस्थानक, रेल्वेस्थानक येथे हात धुण्याची व्यवस्था करून दिली आहे. कोरोना विषाणूशी लढण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. शक्यतो स्वतःच्या घरी रहावे. स्वच्छतेची काळजी घ्यावी. जेणेकरून आपला जिल्ह्यात या विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आव्हान त्यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details