वर्धा- वर्ध्यातील भाजप युवा मोर्चाच्यावतीने जम्मू काश्मीरमध्ये घडलेल्या भाजपयुमोच्या कार्यकर्त्यांचा हत्याकांडाचा निषेध केला. शुक्रवारी सायंकाळी शहरातील शिवाजी चौकात एकत्र येत पाकिस्तानचा झेंडा पायदळ तुडवत पेटून देण्यात आला. युवा मोर्चाच्या तीन कार्यकर्त्यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून केलेल्या हत्येत पाकिस्तानचा कट असल्याचा आरोप करत घोषणाबाजी करण्यात आली.
पाकिस्तानचा झेंडा जाळून जम्मू काश्मिरातील हत्येच्या घटनेचा निषेध - भाजपयुमोच्या कार्यकर्त्यांचा हत्याकांडाचा निषेध
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या तीन कार्यकर्त्यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ वर्ध्यात भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील शिवाजी चौकात एकत्र येत हत्येच्या घटनेचा निषेध केला.
पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या तीन कार्यकर्त्यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ वर्ध्यात भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील शिवाजी चौकात एकत्र येत हत्येच्या घटनेचा निषेध केला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवत जाळून टाकण्यात आला. या भ्याड हल्ल्याचे उत्तर भारत सरकार सक्षसपणे देईल, असा विश्वास यावेळी भाजप युवा मोर्चाच्या नेत्यांनी व्यक्त केला.
या घटनेच्या निषेधार्थ भाजपचे संघटन महामंत्री अविनाश देव, यांच्यासह राहुल करंडे, मोहित उमाटे, रजत शेंडे, विक्की जयस्वाल, कृष्णा जोशी, वैभव तिजारे, राम मोहिते आदी पदाधिकारी उपास्थित होते. युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.