महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'14 हजार शेतकरी आत्महत्येचे पाप कुठे फेडाल?' - आर्वीमधील काँग्रेस उमेदवार अमर काळे

मुख्यमंत्री म्हणतात मी तेल लावून मैदानात उतरलो आहे. या सरकारने पूर्ण महाराष्ट्राला तेल लावले आहे. तेल न लावता मैदानात उतरा. जनता तुम्हाला धूळ चारेल. निसटून पळण्यासाठी तेल लावले जात असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

विजय वडेट्टीवार

By

Published : Oct 16, 2019, 8:13 AM IST

Updated : Oct 16, 2019, 8:23 AM IST

वर्धा - महाराष्ट्रात १४ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊनही डोळ्यात पाणी येत नाही. शेतकऱ्यांचा शाप लागेल आणि सरकार भस्मसात होईल, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी केले. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे पाप कुठे फेडाल? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला. आर्वी येथील कन्या शाळेच्या मैदानावर आघाडीचे आमदार अमर काळे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

'14 हजार शेतकरी आत्महत्येचे पाप कुठे फेडाल?'

मुख्यमंत्री म्हणतात मी तेल लावून मैदानात उतरलो आहे. या सरकारने पूर्ण महाराष्ट्राला तेल लावले आहे. तेल न लावता मैदानात उतरा. जनता तुम्हाला धूळ चारेल. निसटून पळण्यासाठी तेल लावले जात असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.

हे वाचलं का? - एकनाथ खडसेंना व्हायचंय पंतप्रधान!

'मोदी साहब आ गये तो बस आने लगी, ट्रेन चलने लगी, विमान उडणे लगा, हॉस्पीटल बन गये, स्कूल बन गये'. मोदी नव्हते तर या देशात काहीच नव्हते, असेही ते म्हणाले. सरकारने दोन चार सिमेंट रस्त्यांच्यावर रस्ते बांधले नाही. उलट अख्खा महाराष्ट्र खड्ड्यात घातला. महाराष्ट्र उद्ध्वस्त केला आहे. महागाई वाढली. तेल, साखरेचे भाव वाढले. २२ रुपयांची साखर ४० वर गेली. जिऱ्याचे भाव वाढले. आता भाजीत जिरे टाकू नका. फडणवीस आणि मोदीला टाका आणि तडका द्या, अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली.

हे वाचलं का? -मला मोदी-शाहांची काळजी वाटते, झोपेतसुद्धा ते माझ्या नावाने चवताळून उठत तर नसतील ना?

उद्धव ठाकरे ५ वर्ष झोपले होते का? -
उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा घेतला. त्यामध्ये सरकार आल्यास कर्जमाफी करू, असे सांगितले. मग ५ वर्ष ते काय झोपले होते काय? अशी टीका वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरेंवर केली. यावेळी दसरा मेळाव्यात सरकार आल्यास कर्जमाफी करू असे सांगतात, मग पाच वर्षे झोपले होते काय, अशी टीका उद्धव ठाकरेंवर केली. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, वर्धा मतदार संघाचे उमेदवार शेखर शेंडे आदी उपस्थित होते.

Last Updated : Oct 16, 2019, 8:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details