महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वीज बिलाची होळी करत वितरण कार्यालयापुढे धरणे देणार - वामनराव चटप

1 ऑगस्टच्या आंदोलनानंतर 9 ऑगस्टला नागपूरच्या संविधान चौकातून ऊर्जा मंत्री यांच्या घरापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांचे वीज बील माफ करा, ही प्रमुख मागणी असणार आहे. तसेच यातून विदर्भ राज्याचा संकल्प घेत सामान्य माणसांपर्यंत ही मागणी जावी म्हणून विजेचा आधार घेऊन हे आंदोलन केल्या जाणार आहे.

By

Published : Jul 27, 2019, 2:11 AM IST

वीज बिलाची होळी करत वितरण कार्यालयापुढे धरणे देणार - वामनराव चटप

वर्धा - मागील काही महिन्यांपासून वीज वितरण विभागाकडून ग्राहकांना जास्तीचे दर आकारण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाला आहे. सर्वसामन्यांची ही अडचण ओळखून विदर्भ राज्य आघाडी वाढत्या वीज दराच्या विरोधात आक्रमक झाली आहे. वीज वितरण विभागाच्या अनागोदी कारभाराविरोधात विदर्भ आघाडीच्या वतीने 1 ऑगस्ट रोजी विदर्भात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे, याची माहिती विदर्भ राज्य आघाडीचे नेते वामनराव चटप यांनी दिली. ते वर्धातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

वीज बिलाची होळी करत वितरण कार्यालयापुढे धरणे देणार - वामनराव चटप

1 ऑगस्टच्या आंदोलनानंतर 9 ऑगस्टला नागपूरच्या संविधान चौकातून ऊर्जा मंत्री यांच्या घरापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांचे वीज बील माफ करा, ही प्रमुख मागणी असणार आहे. तसेच यातून विदर्भ राज्याचा संकल्प घेत सामान्य माणसांपर्यंत ही मागणी जावी म्हणून विजेचा आधार घेऊन हे आंदोलन केल्या जाणार आहे.

या आंदोलनात विजेच्या बिलाचे दर, वहन कर, इंधन समायोजन भार, प्रति युनिट भाडे, आदी अन्यायकारक अधिभार रद्द करण्याची मागणी यामाध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी संघटना ही विदर्भात विदर्भ निर्माण महामंचात आहे. आम्ही विदर्भ महामंचाच्या सर्व घटकांसह विदर्भाच्या 62 जागा लढणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप यांनी दिली. यावेळी शेतकरी संघटनेचे राम नेवले, उल्हास कोटमकर,निलकंठराव घवघवें, माधुरी पाझारे, गजानन निकम, मधुसूदन हरणे, ज्योती निकम, सतीश दानी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details