वर्धा - शहरात शुक्रवारी तापमानाचा पारा ४३.३ अंशावर गेल्यानंतर सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. विजांच्या कडकडाटासह आर्वी आणि वर्धा तालुक्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या आहेत. अवकाळी पावसाच्या सरी आल्याने कडाक्याच्या उन्हाने त्रासलेल्या नागरिकांना दिलासा मिळला आहे.
वर्ध्यात काही भागात पावसाच्या सरी, उन्हाने त्रासलेल्या नागरिकांना दिलासा
एप्रिलमध्येच उन्हाने तापमानाचा चढता पारा गाठल्याने मे महिन्यापर्यंत तापमान उच्चांक गाठेल, अशी नागरिकांना चिंता भेडसावत आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने ४२ ते ४३ अंशाची सरासरी गाठली. वाढलेले हे तापमान लोकांचे जनजीवन विस्कळीत करणारे ठरत आहे. उन्हामुळे अंगाची लाही-लाही होत असताना गुरुवारी आलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्याच्या काही भागात थोडासा गारवा निर्माण झाला. तर काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसल्या आहेत. शुक्रवारीसुद्धा दिवसभराच्या तापमानानंतर सायंकाळी वातावरणात बदल झाला. त्यानंतर पावसाच्या सरीचे आगमन झाले.
राज्यातील उष्माघाताचा पहिला बळी वर्ध्यात-
एप्रिलमध्येच उन्हाने तापमानाचा चढता पारा गाठल्याने मे महिन्यापर्यंत तापमान उच्चांक गाठेल, अशी नागरिकांना चिंता भेडसावत आहे. या वाढलेल्या तापमानामुळे उष्माघाताचा राज्यातील पहिला बळी जिल्ह्यातील तरुण ठरला आहे. जिल्ह्यातील धामणगाव येथे त्याचा मृतदेह आढळून आला आहे. गुरुवारी पहिल्या टप्प्यात लोकसभेचे मतदान पार पडले. त्यादिवशी ४४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे