वर्धा - जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी रात्री निसर्गाचा कहर पाहायला मिळाला. यात आर्वी, वर्धा आणि सेलू तालुक्यातील काही महसूल मंडळातच पावसाने आणि वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरावरील निवारा हिरावला. कापूस पिकाचे नुकसान झाले तर पॉलिहाऊस फाटल्याने आर्थिक फटका बसला. यामध्ये वर्धा तालुक्यातील मंदनी दिंडोरा येथील शेतकरी यांचा 35 ते 40 क्विंटल कापूस हा सीसीआय खरेदी न झाल्याने विकू शकले नाही. अखेर गुरुवारी झालेल्या पावसात आलेल्या लोटामुळे वाहून गेला, तर झाकून असलेला बराच कापूस भिजल्याने त्याची गुणवत्ता ढासळली. अगोदरच कापसाचे भाव पडल्याने व्यापारी लुटत आहेत. यात आणखी भर पडल्याने ह्या पावसात भिजलेल्या कापसाने नुकसानात मोठी भर पडली आहे.
अवकाळी पावसासह वादळाचा कहर, शेतकऱ्याचे पुन्हा आर्थिक नुकसान - वर्धा पीक नुकसान
गुरुवारी झालेल्या पावसात आलेल्या लोटामुळे वाहून गेला, तर झाकून असलेला बराच कापूस भिजल्याने त्याची गुणवत्ता ढासळली. अगोदरच कापसाचे भाव पडल्याने व्यापारी लुटत आहेत. यात आणखी भर पडल्याने ह्या पावसात भिजलेल्या कापसाने नुकसानात मोठी भर पडली आहे.
याच परिसरात प्रगतीशील शेतकरी माधव वानखडे यांच्या पॉलिहाऊसच्या चिंधळ्या झाल्या. ज्याप्रमाणे पॉलिहाऊस फाटले त्याचप्रमाणे आमच्या शेतकऱ्याचे आयुष्य फाटले असल्याचे ते बोलून दाखवतात. सतत दोन तास झालेल्या पावसाने चक्क पॉलिहाऊसचे लोखंडी खांब मोडून पडले. यामुळे पुढील काळात घेतले जाणारे पीक गेले. शिवाय या पॉलिहाऊसची फिल्म फाटल्याने दुरुस्तीसाठी लागणारा खर्च पाहता नुकसान न सोसणारे आहे. यात साधरण पुढील पीक धरून 8 ते 10 लाखांचे नुकसान अवघ्या दोन तासाच्या वादळी वाऱ्याने केल्याचे ते सांगतात.
दरम्यान, आर्वी तालुक्याच्या खरांगणा (मोरांगणा) परिसरात जोरदार वादळ झाले. यावेळी तासभर पावसाने हजेरी लावली. पावसादरम्यान काही प्रमाणात गारही झाली. अवेळी आलेल्या पावसान भागातील संत्रा, लिंबू,भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. यासह काही गावातील काही घरांवरील, गोठ्यांवरील छत उडाले आहे. छत उडाल्याने खोलीमध्ये असलेला शेतमाल पावसात चिंब भिजला आहे. सेलू तालुक्यातील चाणकी कोपरा येथील घरावरील छत टिनाचे पत्रे उडाले. गावातील उच्चदाब १८ पोल व एजीएलटी - ५५ पोल असे ७३ पोल जमीनदोस्त झाली आहे.