महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कारंजात आढळला मानवी सांगाडा; २५ वर्षीय युवकाचा असल्याचा संशय - police

या सांगाड्याचे जनावरांनी लचके तोडले आहेत. त्यामुळे शरीराचा काही भाग विखुरलेल्या परिस्थितीत दिसून आला.

वर्ध्यात अढळला मानवी सांगाडा

By

Published : Mar 17, 2019, 3:55 PM IST

वर्धा- कारंजातील मोर्शी रोडवरील पेट्रोल पंपाजवळच्या शेतात मानवी सांगाडा आढळून आला आहे. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. हा सांगाडा आज सकाळी एका शेतकऱ्याच्या नजरेस पडताच त्याने याची माहिती कारंजा पोलिसांना दिली. यानंतर हा मृतदेह पोत्यात भरून फेकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पाहणीवरून व्यक्त होत आहे. प्रकरण दाखल करत तपास सुरू केला आहे.

या सांगाड्याचे जनावरांनी लचके तोडले आहेत. त्यामुळे शरीराचा काही भाग विखुरलेल्या परिस्थितीत दिसून आला. पोलिसांना पाहणी दरम्यान ही बाब निदर्शनास आली असून घटना स्थळाची पाहणी करून हाडे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. हा सांगाडा २५ वर्षीय युवकाचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

वर्ध्यात अढळला मानवी सांगाडा

पोलिसांपुढे तपासाचे आव्हान -

अज्ञात युवकाचा हा सांगाडा असल्याने याचा तपास करणे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे. राष्ट्रीय महामार्ग ६ असल्याने पर राज्यांतून मोठया प्रमाणात जड वाहनांची ये-जा या मार्गावर असते. १२ सप्टेंबर २०१५ मध्येही बोरी शिवारात अशाच प्रकारे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. याच राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव पोलीस ठाण्या अंतर्गत असेच एक प्रकरण दाखल आहे. ज्याचा शोध अद्यापही लागलेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details