वर्धा - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्य वेळी देवेंद्र फडणवीस यांना लाथ मारली, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केले आहे. ते वर्ध्याच्या स्थानिक विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
यावेळी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबाबत बोलताना आझमी म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचललेल्या या पावलामुळे देशातील झोपलेले लोक जागे झाले आहेत. या कायद्यांविरोधात आंदोलनासाठी आज संपूर्ण देश एकत्र आला आहे. तसेच, महाराष्ट्रातील अल्पसंख्यांकांचे मी एका गोष्टीबाबत अभिनंदन करू इच्छितो. ते म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी योग्य वेळी फडणवीसांना लाथ मारून, राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले. अन्यथा उत्तर प्रदेशमध्ये सध्या जे सुरू आहे, तेच इथेही झाले असते.