रेती काढताना दोन तरुण यशोदा नदीत बुडाले, शोध मोहीम सुरू - watrdha yasoda river news
नदी पात्रतील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने यशोदा नदीत रेती काढण्यासाठी गेलेल्या दोन तरुण बुडाल्याची घटना घडली. तुषार लाभाडे व मंगेश सोनवणे अशी त्यांची नावे आहेत.
रेती काढताना दोन तरुण नदीत बुडाले
वर्धा - जिल्ह्यातील कानगाव जवळील चानकी भगवा गावालागत वाहणारी यशोदा नदीत दोघे बुडल्याची धक्कादायक घटना घडली. हे दोघेही नदी पात्रात रेती काढण्यासाठी गेले असल्याचे चर्चा परिसरात आहे. दोघांचेही कपडे आणि चपला नदीच्या काठावर दिसून आल्याने त्यांचा शोध सुरू करण्यात आला. तुषार रवींद्र लाभाडे (२५), मंगेश सोनवणे(24) अशी बुडालेल्या युवकांची नावे असून ते दोघेही कानगांव येथिल रहिवासी आहेत.