वर्धा- जिल्ह्यातील पुलंगाव येथे नागपूर-मुंबई महामार्गावर दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली.या अपघातात दोन दुचाकीस्वार युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
नागपूर-मुंबई महामार्गावरील पुलंगाव जवळील रिलायंस पेट्रोलपंपासमोर हा अपघात झाला आहे. दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की २ दुचाकीस्वार युवकांचा यात जागेवरच मृत्यू झाला. सुमित गुलहाने (२१) तर निहाल बोरकर (१९) अशी मृतांची नावे आहेत.