वर्धा -जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भगवा शिवारातील नदीवर विना परवाना वाळू वाहतूक करणारे दोन टिप्पर महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जप्त केले. ही कारवाई हिंगणघाटचे तहसीलदार श्रीराम मुंदडा यांच्या आदेशावरून मंडल अधिकारी आणि पोलिसांनी केली.
विनापरवाना वाळू वाहतूक करणारे दोन टिप्पर जप्त; महसूल आणि पोलिस विभागाची वर्ध्यात संयुक्त कारवाई - Illegal sand transportation
भगवा शिवारातील नदीवर जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी अनधिकृतरीत्या वाळू वाहतूक करणारे दोन्ही टिप्पर जप्त करण्यात आले. त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन करून वाळू विकली जात आहे. अल्लीपूर महसूल मंडळ भगवा शिवारात नदीवर दोन टिप्पर विना परवाना अनिधिकृत रित्या वाळूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. तहसीलदार श्रीराम मुंदडा गुप्त माहितीच्या आधारे लगेच अल्लीपूर येथील मंडल अधिकारी जे. यू. म्हसाळे आणि ठाणेदार योगेश कमाले यांना त्या ठिकाणी पाठवले.
भगवा शिवारातील नदीवर जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी अनधिकृतरीत्या वाळू वाहतूक करणारे दोन्ही टिप्पर जप्त करण्यात आले. त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. टिप्पर नदी भागातून आणून मंडल कार्यालयात लावण्यात आले. याप्रकरणी चौकशी करून कारवाईची मागणी नागरिक करत आहे.