महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुरुजी असं वागणं बरं नव्हं... मद्यपान करणाऱ्या दोन शिक्षकांवर निलंबनाची कारवाई ! - teachers suspended for drunkenness

वर्धा जिल्ह्यात मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या दोन शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत हे दोन्ही शिक्षक कार्यरत होते.

Wardha Zilla Parishad Education Department
वर्धा जिल्हा परिषद शिक्षण विभाग

By

Published : Jan 22, 2020, 8:10 AM IST

वर्धा - हिंगणघाट पंचायत समितीतील चाणकी शाळेतील शिक्षकाने क्रिडा संमेलनात तर आष्टी पंचायत समितीत चिंचोली येथील शिक्षकाने जिल्हा परिषद मुख्यालयात गोंधळ घातला होता. या प्रकरणी दोघांनाही मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओम्बासे यांनी निलंबित केले. प्रशांत हुलके आणि सतीश नगराळे असे या शिक्षकांची नावे आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत हे दोन्ही शिक्षक कार्यरत होते.

वर्ध्यात दारू पिऊन गोंधळ घालणारे दोन शिक्षक निलंबित

हेही वाचा... 'त्या' बाळांना निर्दयीपणे उघड्यावर टाकणाऱ्या मातापित्यांचा लागला शोध

विद्यादान करणारे शिक्षक मद्यपान करून शिवीगाळ करत गोंधळ घालणार असतील तर हा विषय नक्कीच गंभीर आहे. शिक्षकी पेशाला न शोभणारे हे वर्तन असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आले असल्याचे शिक्षण अधिकारी उल्हास नरड यांनी म्हटले आहे. आष्टी पंचायत समितीच्या शिक्षकाकडून 13 जानेवारीला सदर गोंधळाचा प्रकार घडला होता.

हेही वाचा... अंगणवाडीच्या निकृष्ठ कामामुळे चिमुकल्यांवर उघड्यावर बसण्याची वेळ

या शिक्षकांना पुढील तीन महिन्यांकरिता निलंबित केले आहे. याच दरम्यान विभागीय चौकशी अहवाल तयार करून पुढील कारवाई केली जाईल. सध्या या शिक्षकांना मुख्यलयात पाठवण्यात आले आहे. हिंगणघाट पंचायत समितीतील शाळेत कार्यरत असलेल्या क्रीडा संमेलनात गोंधळ घालणाऱ्या प्रशांत हुलके या शिक्षकाला निलंबन काळात समुद्रपूर मुख्यालय देण्यात आले आहे. आष्टी पंचायत समितीत कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेत गोंधळ घालणाऱ्या सतीश नगराळे या शिक्षकाला निलंबन काळात कारंजा (घाडगे) मुख्यालय देण्यात आले आहे.

हेही वाचा... 'आव्हान म्हणून स्वीकारल्यास डॉ.आंबेडकरांचे स्मारक दोन वर्षात होणार पूर्ण'

ABOUT THE AUTHOR

...view details