वर्धा - कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांसह भारतातही याचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे चीनसह अन्य 11 देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर पाळत ठेवण्याचे काम राज्य सरकरच्या आरोग्य विभागाकडून केले जात आहे. वर्ध्यातही दोन जणांवर आरोग्य विभागाच्यावतीने देखरेख ठेवली जात आहे. यातील एक व्यक्ती हा शिक्षणासाठी तर दुसरा धार्मिक कामानिमित्त बाहेरदेशात गेले होते. ते भारतात परतल्यानंतर काळजीपोटी त्यांना घरातच वेगळे ठेवून तपासणी केली जात आहे. यातील एक व्यक्ती हा इराणमधून तर दुसरा हा दक्षिण कोरियातून आला आहे. यामुळे काळजीपोटी परदेशातून आलेल्या व्यक्तींना कोरोनामुळे बाधा झाली असल्यास त्यामुळे इतरांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाकडून काळजी घेतली जात आहे.
परदेशातून आलेल्या व्यक्तिंची माहिती मिळताच त्या व्यक्तीला राहत्या घरात इतरांपासून वेगळे ठेवले जाते. यात काळजी म्हणून त्यांची दोन वेळेस तपासणी केली जाते. यात हिंगणघाट आणि वर्धा अशा दोन ठिकाणचे हे व्यक्ती आहेत. दोघांचीही प्रकृती ठीकठाक असून त्यांना सर्दी खोकला ताप यासह अन्य काही लक्षणे आढळले नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार काळजी घेतली जात असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ पुरुषोत्तम मडावी यांनी सांगितले.
14 दिवस का ठेवले जाते -