वर्धा -राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना वर्धा जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचा एकही रूग्ण सापडला नव्हता. त्यामुळे वर्धा ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, आज सकाळी दोन कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने वर्धा ग्रीन झोनच्या बाहेर पडला आहे. यातील एक रूग्ण हा वाशिम जिल्ह्यातून उपचारासाठी वर्ध्यात आला होता. तर आर्वी तालुक्यातील महिलेचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
वर्ध्यातील सावंगी मेघेचा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात विदर्भासह अनेक ठिकाणाहून रुग्ण येतात. यात वाशिम जिल्ह्यातील एक रूग्ण आला होता. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.