वर्धा- उन्हाळा शेवटच्या टप्यात असताना तसेच पाऊस पडताच डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आढळून येतो. मात्र, याच डासांसोबत अनेक गंभीर आजार येतात. यात मलेरिया चिकगुणिया यासारखे आजार आहेच. तसेच डेंग्यू आणि नावाने जापनीज वाटणारे जपानी मेंदूज्वर, चंडीपुरा यासारखे किटकजन्य आजार हे सुद्धा येतात. याच जापनीज मेंदूज्वरने वर्ध्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे प्रशासनाच्या वतीने डास होऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रोहन चव्हाण (3) तर शांताबाई शेळके (40) यांचा मृत्यू झाला.
जापनीज मेंदूज्वरने वर्ध्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. जापनीज मेंदूज्वराला जेई किंवा जपानी एनकेप्लायटीस या नावाने ओळखले जाते. स्नॉडफ्लाय किटकांपासून हा विषाणूजन्य आजार तयार होतो. तसेच क्युलेक्स विष्णूई मादी डास चावल्याने होतो. जिल्ह्यात साधरण लक्षणे पाहता 25 रुग्णांची रक्ततपासणी सेवाग्राम रुग्णलायत करण्यात आली होती. यावेळी 8 रुग्ण हे पॉजिटीव्ह आढळले होते. यात दोघे दगावले असून इतर सहा रुग्ण हे वेळीच औषधउपचार मिळाल्याने बरे झाले आहे.
मेंदूज्वराची रोग आणि लक्षणे
मेंदूज्वर हा क्युलेक्स विष्णूई या जातीच्या मादी डास चावल्यास विषाणूमुळे होतो. हे विषाणू दूषित पाण्यासह स्वच्छ पाण्यात सुद्धा असतात. तसेच या विषाणूची वाढ ही प्राण्यांचा अंगावर होते. हे डास सायंकाळी घरात घुसून चावा घेत असल्याचे सांगितले जाते. यामुळे हे डास चावल्यास तीव्र ताप, अंगदुखी मानसिक संतुलन बिघडणे, बोलायला त्रास होणे, शुद्ध हरपणे, उलट्या येणे शुद्ध हरवणे, किंवा हिंसक होणे, झटके येणे अशा स्वरूपाचे लक्षण रुग्णांमध्ये आढळतात. या आजाराची लक्षणे दिसण्यासाठी 5 ते 15 दिवसाचा कालावधी लागत असल्याचे बोलले जाते. तसेच हा आजार लहान मुलांना या आजाराची लागण होण्याची भीती अधिक असते.
आर्वी तालुक्यातील खरांगणा येथे शांताबाई शेळके या महिलेचा मृत्यू जपानी मेंदूज्वरने झाला होता. तसेच वर्धा शहराला लागुन असलेल्या पारधी बेड्यावरील रोहन चव्हान या तीन वर्षाच्या मुलाला आजाराची लागण झाली. यात उपचार मिळेपर्यंत उशिर झाल्याने मृत्यू झाला.
उपाययोजना करत काळजी घेण्याचा आवाहन
या आजारापासून सरंक्षण करायचे असल्यास महत्वाचे पाऊल म्हणजे डास होऊ देऊ नये. यात परिसरात स्वछता बाळगणे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, पाणी साचू देऊ नये. हे डास गढूळ पाण्यातच नाही तर स्वच्छ पाण्यात सुद्धा सहज जगतात. सायंकाळी दार बंद ठेवून धूर करणे, झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करणे यासारखे साधे उपाय करून बचाव केला जाऊ शकतो. तसेच आजाराचे लक्षणे दिसतात तात्काळ संबंधित रुग्णालयात जाऊन रक्त तपासणी करून औषध उपचार घेण्याचे आवाहन हिवताप अधिकारी डॉ. ल.म. पारेकर यांनी केले.