महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्धेत दुचाकी ट्रकवर आदळली, दोघांचा जागीच मृत्यू - truck two wheeler accident malkapur

सुबोध आणि दुर्गेश हे कामानिमित्त दुचाकीने पुलगाववरून दुचाकी क्र. (एम.एच ४०, जे. ४५१३) ने जात होते. दरम्यान, ट्रक क्र. (एम.एच ०४, एचएस. १५२६) हा पुलगावच्या दिशेने जात होता. अचानक सुबोध आणि दुर्गेश हे दोघेही दुचाकीस्वार वळणावर ट्रकला येऊन धडकले.

wardha
क्षतीग्रस्त दुचाकी

By

Published : Jan 5, 2020, 11:07 PM IST

वर्धा- जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील मलकापूर (बोदड) येथील बसस्थानका समोर दुचाकी ट्रकच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रक वर्धेकडून नागपूरच्या दिशेने तर दुचाकीस्वार दोघेही वर्धेच्या दिशेने जात होते. यावेळी अचानक दुचाकीचालक ट्रकवर जाऊन आदळला. सुबोध सरदार आणि दुर्गेश सोमकुवर, अशी अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहे. दोघेही नाचांगावचे रहिवासी आहेत.

सुबोध आणि दुर्गेश हे कामानिमित्त दुचाकीने पुलगाववरून दुचाकी क्र. (एम.एच ४०, जे. ४५१३) ने जात होते. दरम्यान, ट्रक (एम.एच ०४, एचएस. १५२६) हा पुलगावच्या दिशेने जात होता. अचानक सुबोध आणि दुर्गेश हे दोघेही दुचाकीस्वार वळणावर ट्रकला येऊन धडकले. काही प्रत्यक्षदर्शीनी ही माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी पोलिसांनी दुर्गेशला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दोघांनाही जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. या अपघातात ट्रकही क्षतीग्रस्त झाला होता. ट्रक आणि दुचाकी हे पुलगाव पोलीस स्टेशनला आणण्यात आले असून पुढील तपास पुलगाव पोलीस करत आहे.

हेही वाचा-पक्षीमित्र संमेलनाकरिता सायकलची सवारी; वर्धा ते अलिबाग होणार प्रवास

ABOUT THE AUTHOR

...view details