वर्धा- येथील सेलूमधील पोलीस ठाण्याजवळील असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरले आहे. याच प्रकारे सेवाग्राम पोलीस ठाण्याअंतर्गत 1 जानेवारीला एटीएम चोरले होते. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वर्ध्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ; आठवड्यात दोन एटीएम मशीन चोरीला - एटीएम चोरी वर्धा
एटीएममधील सीसीटीव्ही निकामी करून सायरनचे वायर कापून चोरट्यांनी हे एटीएम पळवले आहे. या एटीएममध्ये नेमके किती रक्कम होती, याची एटीएमची देखरेख करणाऱ्या कंपनीकडून अधिकृत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
two-atm-machines-stolen-a-week-in-wardha
हेही वाचा-घाटकोपरमधील निर्घृण खुनाचे रहस्य उलगडले; पोटच्या मुलानेच केली होती आईची हत्या..
एटीएम मधील सीसीटीव्ही निकामी करून सायरनचे वायर कापून चोरट्यांनी हे एटीएम पळवले आहे. या एटीएममध्ये नेमके किती रक्कम होती, याची एटीएमची देखरेख करणाऱ्या कंपनीकडून अधिकृत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. सेलू पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे. याची माहिती ठाणेदार सुनील गाढे यांनी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.