वर्धा- देवळी तालुक्यातील पुलगाव येथे विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना पुलगाव पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी (दि. 19 ऑक्टोबर) दुपारी दुचाकीवरून येताना राम मंदिर परिसरात सापळा लावून कारवाई करण्यात आली आहे. यावेळी दोघांमकडून दोन गावठी पिस्तुलासह 11 जिवंत काडतुस आणि एक चाकू जप्त करण्यात आले आहे. हे दोघेही रेती व्यवस्याशी निगडित असल्याने बोलले जात आहे. गणेश रमेश येदबान (वय 43 वर्षे) आणि अविनाश गणेश खोडे (दोघे रा. पुलगाव, ता. देवळी) असे अशी दोघांची नावे आहेत.
वर्धा : पुलगावात दोन गावठी पिस्तुलासह अकरा जिवंत काडतुसे जप्त, दोघे अटकेत - पुलगाव पोलीस बातमी
देवळी तालुक्यातील पुलगाव येथे दोघांकडून दोन गावठी पिस्तूल, अकरा जिवंत काडतूस आणि एक धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पुलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांची चौकशी सुरू आहे.
आरोपींसह पोलीस पथक
Last Updated : Oct 19, 2020, 10:39 PM IST