वर्धा - हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची अखेर मृत्यूशी झुंज संपली आहे. सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पीडितेला ह्रदयविकाराचा झटका आला. अखेर सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली. पीडित तरुणी ज्या महाविद्यालयात प्राध्यापिका होती, त्या महाविद्यालयात तिच्या सहकाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी श्रध्दांजली वाहिली.
हिंगणघाट जळीतकांड : महाविद्यालयातील 'ती' च्या सहकारी अन् विद्यार्थ्यांनी वाहिली श्रध्दांजली हेही वाचा -हिंगणघाट जळीतकांड : अखेर झुंज संपली, आज सकाळी पीडितेचा मृत्यू
यावेळी पीडितेच्या जाण्याने आम्हाला सर्वांना अतिव दु:ख झाल्याची भावना महाविद्यालयाचे प्राचार्य उमेश तुळसकर यांनी बोलून दाखवली. पीडित तरुणीवर हल्ला करणाऱ्या नराधमाला फाशी द्या, अशी मागणी त्यांनी केली. तिला न्याय मिळाला नाही, तर आम्ही विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरून न्याय मागू, असे प्राचार्य तुळसकर म्हणाले.
हेही वाचा -हिंगणघाट जळीतकांड : 'त्या' नराधमाला तिथेच पेटवा; पीडितेच्या मृत्यूनंतर वडिलांची मागणी
दरम्यान, वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाटमधील नांदोरी चौकात ३ फेब्रुवारीला (सोमवारी) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास प्राध्यापिकेला आरोपी विकी नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे हिंगणघाट हादरून गेले होते. गेल्या सात दिवसांपासून पीडित तरुणीवर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.