वर्धा -दसरा हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी रामाने रावणाचा वध केल्याचे मानले जाते. विजयादशमीनिमित्त वर्ध्यात आयोजीत केलेल्या रावण दहन कार्यक्रमला आदिवासी समुदायाने विरोध केला.
आदिवासी समुदाय रावणाला राजा मानून त्याची पूजा करतात. यामुळे आदिवासी बांधवांनी रावण दहनाला विरोध केला. वर्ध्यात गर्जना संघटनेच्यावतीने रावण दहनाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. यासाठी पोलिसांची परवानगी देखील घेण्यात आली होती. कार्यक्रमावेळी आदिवासी समुदायाचे काही लोक हे गर्जना चौकात पोहचले.