महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात अडकलेल्यांना मिळणार दिलासा; अर्ज निकाली काढण्यासाठी रात्रंदिवस चालणार काम, १२ जणांची नियुक्ती - वर्धा लॉकडाऊन

एका जिल्ह्यातून, राज्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, राज्यात जाण्यासाठी राज्यस्तरावर एकच पोर्टल तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात, राज्यात जाण्यासाठी तसेच बाहेर जिल्ह्यातून, राज्यातून जिल्ह्यात येण्याकरिता परवानगी घेणे आवश्यक आहे. यासाठी कोविड19 डॉट एम.एच पोलिस.इन (covid19.mhpolice.in) या पोर्टलवर अर्ज करावयाचे आहेत.

travalling passes
travalling passes

By

Published : May 9, 2020, 10:27 AM IST

वर्धा- लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांची स्व:गावी तसेच कामाच्या ठिकाणी जाण्याकरिता धडपड सुरू आहे. त्याकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. राज्यभरातून जिल्ह्यात, गावी येण्यासोबतच गावातून, जिल्ह्यातून राज्याबाहेर जाण्यासाठी परवानगीच्या अर्जांचा खर्च ऑनलाईन साईटवर जमा होत आहे. त्यामुळे अर्ज तातडीने निकाली काढण्यासाठी आता अहोरात्र परवानगीचे काम चालणार आहे. ९ मेपासून तीन पाळींमध्ये हे काम चालणार असून त्याकरीता बारा जणांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी दिली.

एका जिल्ह्यातून, राज्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, राज्यात जाण्यासाठी राज्यस्तरावर एकच पोर्टल तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात, राज्यात जाण्यासाठी तसेच बाहेर जिल्ह्यातून, राज्यातून जिल्ह्यात येण्याकरिता परवानगी घेणे आवश्यक आहे. यासाठी कोविड19 डॉट एम.एच पोलिस.इन (covid19.mhpolice.in) या पोर्टलवर अर्ज करावयाचे आहेत.


या पोर्टलवर आजपर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरीता चार हजार 337 जणांनी अर्ज सादर केलेत. त्यातील 1 हजार 156 जणांना परवानगी दिल्याचे सांगण्यात येत आहे. 1177 अर्ज नाकारण्यात आले. जिल्ह्यातून बाहेर जाण्याच्या परवानगीकरिता सादर केलेले 2067 अर्जावर कार्यवाही सुरू आहे.

वर्ध्यात अडकलेल्यांना मिळणार दिलासा, अर्ज निकाली काढण्यासाठी तीन पाळींकरीता १२ जणांची नियुक्ती
या पूर्वीच्या ई सेवा पोर्टलवर 1392 अर्ज आले आहेत. त्यातील 905 अर्ज नाकारण्यात आले. 105 अर्जांना परवानगी देण्यात आली असून 380 अर्ज प्रलंबीत आहेत. हे अर्ज वेळेत निकाली काढण्यासाठी आता रात्रंदिवस काम केले जाणार आहे. या कामकाजाचे नियंत्रण निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सुनील कोरडे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.प्रशासनाच्या वतीने परवानगीचे अर्ज निकाली काढण्याकरीता चोवीस तास काम करण्यात येणार आहे. सकाळी आठ ते दुपारी चार, दुपारी चार ते रात्री बारा, रात्री बारा ते सकाळी आठ वाजतापर्यंत टप्प्याटप्प्याने कर्तव्यावर कर्माचारी नेमण्यात आके आहेत. एका पाळीमध्ये 4 कर्मचारी काम करणार आहेत.या कारणांमुळे अर्ज नाकारलेतविविध कारणांनी अर्ज नाकारण्यात देखील येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र जोडलेले नसणे, पत्ता पूर्ण नाही, वाहनाचा योग्य उल्लेख नसणे, प्रवाश्यांची माहिती योग्यरीत्या भरलेली नसल्याने अनेक अर्ज रद्द करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details