वर्धा: विवाहितेचा विवस्त्र व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल करीत नराधमाने तीच्यावर बळजबरीने वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायकल प्रकार समोर आला आहे. सातत्याने होणाऱ्या या अत्याचाराने त्रस्त झालेल्या पिडितेने अखेर याबाबतची तक्रार अमरावती पोलिसात दिली. घटनास्थळ वर्धा येथिल रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने अमरावती पोलिसांनी संबंधित तक्रार पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविली. पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये या प्रकरणात आता रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विवाहिता ही वर्धा येथे तिच्या मैत्रिणीच्या आजीला भेटण्यासाठी आली होती. तेव्हा ती स्वयंपकखोलीत जाऊन कपडे बदलवित असतानाच आरोपीने पीडितेचा विवस्त्र व्हिडीओ मोबाईलमध्ये काढून तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करु लागला. पीडितेने नकार दिला असता व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेशी वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच पीडितेच्या पतीला मारुन टाकेन अशीही धमकी दिली.
अखेर पीडितेने सततच्या त्रासाला कंटाळून अमरावती येथील पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.घटनास्थळ रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तीची तक्रार पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली. पाेलिस अधीक्षक कार्यालयातून ती तक्रार रामनगर पोलिसांना प्राप्त झाल्याने पोलिसांनी आरोपी राकेश आडे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.