वर्धा :सेलू तालुक्यााच्या केळझर येथील जंगल कामगार सोसायटीच्या जवळून वाहणाऱ्या मुख्य कालव्याच्या पाण्यात दीड ते दोन वर्षांची पट्टेदार वाघीण मृतावस्थेत आढळले. आज सकाळच्या सुमारास ही घटना उडघकीस आली.
या परिसरातील विटभट्टीवरील कामगाराना पीर बाबा टेकडीजवळील मुख्य कालव्यात पट्टेदार वाघीण मृतावस्थेत पडून असल्याचे दिसले. यावेळी गावात ही माहिती मिळताच घटनास्थळी एकच गर्दी होऊ लागली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहितीनुसार, ही मादी वाघ शावक दीड ते दोन वर्षाची असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. उजव्या बाजूच्या मागचे, पुढचे पायावर तसेच पुठ्ठ्यावर खरचटल्याचा व्रण प्राथमिक तपासणीत दिसून आले. शरीराचे अवयव नीट असल्याने नेमके मृत्यूचे काय कारण स्पष्ट झाले नाही. शवविच्छेदनाच्या अहवाल्याने हे स्पष्ट होईल असे सांगितले जात आहे.