वर्धा - जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील शिरजगाव (धनाढ्ये) येथे वीज पडून तिघांचा मृत्यू, तसेच एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. हे सर्व लोक शेतात काम करत होते. तेव्हा अचानक पाऊस आल्याने ते शेतातील झोपडीत थांबले होते. मात्र, झोपडीवर वीज पडल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वर्ध्यात वीज पडून तीन ठार; मृतांमध्ये आजी-नातीचा समावेश - Wardha thunder strike three died
गावातील नथू कासार यांच्या पत्नी अनुसया आणि नात अश्विनी हे शेतात गेले होते. त्यांच्यासोबत सालदार नरेश वरठी, आणि देवराव मगर हे देखील होते. दरम्यान सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरणासह विजेचा तांडव सुरू झाले. त्यामुळे विजेपासून बचाव व्हावा म्हणून ते शेताच्या झोपडीत जाऊन थांबले. मात्र, या झोपडीवर वीज पडून तिघांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील नथू कासार यांच्या पत्नी अनुसया आणि नात अश्विनी हे शेतात गेले होते. त्यांच्यासोबत सालदार नरेश वरठी, आणि देवराव मगर हेदेखील होते. दरम्यान सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरणासह विजेचा तांडव सुरू झाला. त्यामुळे विजेपासून बचाव व्हावा म्हणून ते शेताच्या झोपडीत जाऊन थांबले. मात्र, या झोपडीवर वीज पडून तिघांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांमध्ये अनुसया कासार (60), शेतमालकांची नात अश्विनी सहारे (7), सालदार नरेश वरठी (42) यांचा समावेश आहे. तर देवराव मगर हे गंभीर जखमी झाले. देवराम यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले असून, इतर तिघांचे मृतदेह हे जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.