महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देवदर्शनासाठी निघालेल्या युवकांच्या गाडीला अपघात, तिघे ठार चौघे जखमी - three died and four injured in accident

हिंगणघाटमधील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव बोलेरो उभ्या ट्रकला धडकल्याने भीषण अपघात घडला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे जण जखमी झाले आहे. हा अपघात सोमवारी रात्री घडला. हे सर्व नागपूरच्या उमरेडहून गणपतीपुळेला जात होते.

hinganghat national highway accident
हिंगणघाट राष्ट्रीय महामार्गावर अपघात

By

Published : Jan 5, 2021, 11:25 AM IST

वर्धा - हिंगणघाटमधील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव बोलेरो उभ्या ट्रकला धडकल्याने भीषण अपघात घडला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे जण जखमी झाले आहे. हा अपघात सोमवारी रात्री घडला. हे सर्व नागपूरच्या उमरेडहून गणपतीपुळेला जात होते.

देवदर्शनासाठी निघाले होते युवक
उमरेड तालुक्यातील हिवरातील युवक देवदर्शनासाठी गणपतीपुळेला निघाले होते. हिंगणघाट शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे पुलावरून रात्री पावणे 12 वाजेच्या सुमारास राजु शेरगे यांची बोलेरो गाडी भरधाव वेगाने आली. ही गाडी बंद ट्रकवर जोरदार धडकल्याने हा भीषण अपघात घडला. रेल्वेचा उड्डाण पुल उतरताच नांदगाव चौकातील पुलाचे काम चालू असल्याने रस्ता वळवला आहे. याच वळवलेल्या रस्त्यावर ट्रक लावला होता.


तिघांचा मृत्यू चौघे जखमी
या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या चार जणांना सेवाग्राम येथे हलवण्यात आले. या अपघातात मृत्यु झालेल्या तिघांची नावे शैलेश पंढरी गिरसावळे,आदर्ष हरीभाऊ कोल्हे, सूरज जनार्दन पाल हे सर्व उमरेड तालुक्यातील हिवरा हिवरी गावचे रहिवासी आहे. तर यश कोल्हे, भूषन राजेंद्र खोंडे, शुभम प्रमोद पाल, प्रणय दिवाकर कोल्हे, समीर अरुण मोंढे, मोहन राजेंद्र मुंढे यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.


मदतीला युवक धावले
अपघात होताच हिंगणघाट शहरातील सौरभ नाईक सौरभ उरकुडे, शुभम नाईक सागर तिमांडे,विक्की वाघमारे या युवकांनी जखमींना गाडीतुन काढून उपजिल्हा रुग्णालयात हलवले. यातील तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत चव्हाण घटनास्थळी पोहोचले तसेच रुग्णालयात पोहोचत मृतांच्या जखमींच्या कुटुंबीयांशी माहिती देण्यात आली.

हेही वाचा -फेसबुक लाईव्ह करत चिरला स्वत:चा गळा; पुढे काय घडले वाचा एका क्लिकवर

ABOUT THE AUTHOR

...view details