महाराष्ट्र

maharashtra

वर्ध्यात दोघांच्या 'दादा'गिरीला तर, दोघांच्या 'भाऊ'गिरीला मतदारांची पसंती

By

Published : Oct 25, 2019, 6:03 PM IST

वर्ध्यात भाजपचे विद्यमान आमदार पंकज भोयर आणि काँग्रेसचे शेखर शेंडे यांच्यात शेवटपर्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. यात शेखर शेंडे यांचा तिसऱ्यांदा पराभव झाला असून पंकज भोयर यांनी त्यांचा दुसऱ्यांदा पराभव केला आहे. यात पंकज भोयर यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यापूर्वीचा काँग्रेसचे शेखर शेंडे यांनी भाष्य करत पराभव स्वीकारल्याची चर्चा केली होती. तसेच अभद्र युतीत मिळालेली मदत पाहता ही लढत रंगतदार राहिली.

वर्धा

वर्धा- विधानसभा मतदारसंघाचे निकाल आले आहेत. जिल्ह्याच्या निवडणुकीत महत्वाची समजली जाणारी जागा म्हणजे देवळी आणि आर्वी मतदारसंघ. देवळीत रणजित 'दादा' कांबळे आणि आर्वीत 'दादा'राव केचे यांच्या 'दादा'गिरीचा विजय झाला. तसेच भाजपचे पंकज 'भाऊ' भोयर हे वर्धा आणि हिंगणघाट मतदारसंघातून समीर भाऊ कुनावा या दोघांच्या 'भाऊ गिरीला पसंती मिळाली आहे. देवळीतून काँग्रेसचे रणजित कांबळे सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. तर, मागील निवडणुकीत दोन काँग्रेस, दोन भाजप हे समीकरण मोडीत काढून भाजपणे तीन जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे.

प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी साधलेला संवाद

हेही वाचा -यावेळीही जनतेची 'राजा'ला साथ नाहीच? मनसेला नाकारण्याची ही ५ आहेत कारणे...

वर्ध्यात भाजपचे विद्यमान आमदार पंकज भोयर आणि काँग्रेसचे शेखर शेंडे यांच्यात शेवटपर्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. यात शेखर शेंडे यांचा तिसऱ्यांदा पराभव झाला असून पंकज भोयर यांनी त्यांचा दुसऱ्यांदा पराभव केला आहे. यात पंकज भोयर यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यापूर्वीचा काँग्रेसचे शेखर शेंडे यांनी भाष्य करत पराभव स्वीकारल्याची चर्चा केली होती. तसेच अभद्र युतीत मिळालेली मदत पाहता ही लढत रंगतदार राहिली.

देवळी मतदारसंघ

देवळी मतदारसंघ हा काँग्रेसला साथ देणारा तसेच महत्वाचा मतदारसंघ आहे. यात दिवंगत प्रभाराव यांचा वारसा सांभाळणारे रणजित कांबळे यांनी दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे भाजपचे बंडखोर जिल्हाध्यक्षांचा पराभव केला. तेच राष्ट्रवादीतून भाजपच्या हाऊसफुल बोर्डनंतर शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला खरा पण, तिर निशाण्यावर न बसल्याने पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे त्यांना शिवसेनेसारख्या पक्षाची तिकीट भेटून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवता आली नाही, तेच बंडखोरी करत बकाने यांना दुसरे स्थान मिळाल्याने वेगवेगळ्या चर्चा मतदारसंघात ऐकायला मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत निसटता विजय मिळवला असताना यंदा मात्र रणजित कांबळे यांनी 35 हजार 804 मतांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत. त्यानी स्वतःचे जुने रेकॉर्ड मोडीत काढत विजय आणि गड कायम ठेवला हे विशेष.

हेही वाचा -कॉंग्रेसची शिवसेनेसोबत जाण्याची तयारी; नवी समीकरणे बनणार?


हिंगणघाट मतदारसंघ -

सर्वाधिक मताधिक्य घेऊन समीर कुणावर हे विजयी झाले आहेत. यात सेनेची बंडखोरी फारशी काही कमाल करू शकली नाही. तेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा होऊन राष्ट्रवादीचे राजु तिमांडे हे दुसऱया क्रमांकावर असले तरी तरी 50 हजार 500 मतांचे मताधिक्य मिळवत पराभव केला. सेनेचे बंडखोर तीन वेळा आमदार राहिलेले माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांना केवळ 12 हजार मतांवर समाधान मानावे लागले.

आर्वी मतदारसंघात मोदी लाटेत काँग्रेसचे अमर काळे हे निवडून आले होते. यंदाही ही निवडणूक चांगली चुरशीची झाली. यापूर्वी अमर काळे यांनी दोनदा दादाराव केचे यांचा पराभव केला होता. माजी आमदार दादाराव केचे यांनी 2009 आणि 10 वर्षांनी दुसऱ्यांदा अमर काळे यांचा पराभव केला. यंदा त्यांना मिळालेले मताधिक्य सर्वाधिक असून 30 हजारांपर्यंत राहणारा फरक 12 हजार मतांवर जाऊन पोहचला. यात भाजपची ही जागा प्रतिष्ठेची झाली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे स्वीयसहायक सुमित वानखडे हे आर्वीपुत्र असून मागील काळात निधी मिळवत विकासाला त्यांनी हातभार लावला होता. तसेच नितीन गडकरी याचे जवळचे सुधीर दिवे हे सुद्धा आर्वीचे असल्याने या जागांवर विजय मिळवण्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची झाली होती. शिवाय मोदी लाटेत झालेला अवघ्या तीन हजार मतांचा पराभव भाजपला चांगलाच जिव्हारी लागला होता.

हेही वाचा -१४ व्या विधानसभेत महिला आमदारांची संख्या..

जिल्ह्यातील निकाल पाहता भाजपला पुन्हा एक जागा वाढून मिळाल्याने भाजपच्या ताकदीत वाढ झाली. पण, देवळी मतदारसंघातून खासदार रामदास तडस हे येत असताना भाजपला जागा न सुटता जागा वाटपात शिवसेनेला सुटल्याने भाजपचे नुकसानच झाले असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. पण कॉंग्रेसचे रणजित कांबळे यांनीं गड राखत उत्तम राजकारणी असल्याचे सिद्ध केलेच. शिवाय मताधिक्य मिळवत विरोधकांना चारो खाणे चितही केले.

ABOUT THE AUTHOR

...view details