वर्धा -दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा नवरात्र उत्सव यंदा कोरोनाच्या संकटाने साधेपणाने साजरा होणार आहे. ज्या बाजरात नवरात्र उत्सवात पाय ठेवलाही जागा नसायची ती ठिकाणे सध्या कोरोनामुळे रीकामी आहेत. अनलॉक फेज असताना सुद्धा बाजारात मंदीचे सावट असल्याचे दिसून येत आहे. यामुळे दुकानातील वस्तूला पाहिजे त्या प्रमाणात ग्राहक नसल्याने छोटे असो की मोठे व्यवसायिक यांचे व्यवव्हार हे अर्ध्यावर येऊन ठेपले आहे. या काळात देवीच्या सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी असते, पण दुकानात वस्तू भरून असताना सुद्धा ग्राहकांनी मात्र पाठ फिरवली असल्याचे व्यापारी वर्ग सांगत आहे.
यंदा नवरात्री उत्सवावर कोरोनाचे सावट; बाजारातील रेलचेल मंदावली - वर्धा नवरात्री बातमी
मोठ्या उत्साहात साजरा होणारा नवरात्र उत्सव यंदा कोरोनाच्या संकटाने साधेपणाने साजरा होणार आहे. त्यामुळे बाजारात सुद्धा मंदीचे सावट आहे.
![यंदा नवरात्री उत्सवावर कोरोनाचे सावट; बाजारातील रेलचेल मंदावली this-year-navratri-festival-will-celebrated-simply-due-to-corona-in-wardha](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9202437-thumbnail-3x2-wardha.jpg)
यंदा नवरात्री उत्सवावर कोरोनाचे सावट; बाजारातील रेलचेल मंदावला
बाजारातील परिस्थितीचा आढावा घेताना प्रतिनिधी
नवरात्र उत्सवासाठी देवीच्या सजावटी साठी चुनरी, हार, प्लास्टिक फुले, देवीच्या हातात दिसणारे शस्त्र, देवीची हिरवा चुडा, बांगड्या, रांगोळी, देवीचे साहित्य, ओटीचे साहित्य, हळद कुंकू, यासह पूजेसाठी आणि मंडप असो की देवीच्या अंगावरील आभूषण यासाठी लागणारे साहित्याची बाजारात रेलचेल असते. पण सध्या दुकानात एखाद दोन ग्राहक आहे. काही ठिकाणी काउंटर खाली सुद्धा पाहायला मिळत आहे.