वर्धा - आज सर्वत्र एटीएम नजरेस पडतात. दिवसभर यावर पैसे काढणारे ग्राहक हे एकप्रकारे सुरक्षारक्षकाचे काम करतात. पण, रात्र होताच हे सर्व एटीएम रामभरोसे चालत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. वर्धा शहराच्या रामनगर पोलीस हद्दीतील धुनिवाले मठ चौकात असलेले स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न मध्यरात्री झाला आहे. मात्र, रस्त्यालगतच्या वाहतुकीमुळे हा प्रयत्न फसला असून या एटीएमला चौथ्यांदा फोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
एटीएम हे जरी बँकेच्या नावाने चालत असले तरी यावर सुरक्षा नेमणे हे काम आरबीआय अंतर्गत एका खासगी कंपनीकडून पाहिले जाते. मात्र, रात्री सुरक्षारक्षक नसल्याने रामभरोसे चालू असलेल्या या एटीएमवर चोरांची नजर जाते. विशेष म्हणजे लाखो रुपये असलेले हे एटीएम अशाप्रकारे सुरक्षेविना चालत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वर्ध्यातील हे एटीएम चौथ्यांदा फोडण्यात अपयशी ठरल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. मात्र, सुरक्षाव्यवस्था नसल्याने हा प्रकार वारंवार घडत आहे. तर, असा प्रयत्न चोरटे परत करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षा व्यवस्था ठेवणे हे संबंधित कंपनीचे काम असून एटीएममधून मिळणारा नफा हा त्या कंपनीला जात असतो. मात्र, सुरक्षेवर खर्च करण्याच्या बाबतीत या कंपन्या दुर्लक्ष करत असल्याचेही पुढे येत आहे. वर्ध्यात एसबीआयचे एटीएम चौथ्यांदा फोडण्याचा प्रयत्न हेही वाचा - इथे महात्मा गांधी समजायला पुस्तकांची गरज नाही, गांधीचा जीवनपट डिजिटल माध्यमातून..
विशेष म्हणजे एटीएममध्ये असलेले सीसीटीव्ही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगून ३ महिन्याचा डेटा ठेवणे आवश्यक असताना तो संपला असल्याने अडचन येत असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. तर, चोरट्यानी एटीएम मशीनच्या सेंटर कॅमेऱ्यावर काळा रंग टाकत त्याला बंद केले आहे. यावरून शहरातील एटीएममध्ये लाखोंची रोकड असताना, याची सुरक्षा रामभरोसे असल्याच चित्र आहे. सध्या एटीएम फोडीची तक्रार रामनगर पोलिसात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - 'भर रस्त्यात शिक्षा दिल्याशिवाय कायद्याची भीती निर्माण होणार नाही'
इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे एटीएम व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. वर्धा शहरातील विविध भागात असे ८ एटीएम असून बँक शाखेत जोडून 17 एटीएम रामनगर पोलिसांच्या हद्दीत येतात. यासह शहरात इतर एटीएमही आहे. पण, या सगळ्याचा नफा कंपनीला होत असतांना सुरक्षा केवळ पोलिसांच्या हाती आहे. यात पोलिसांना तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज लागले तर ते मिळणे गरजेचे आहे. मात्र, एटीएमसाठी देण्यात येणारी सुरक्षा रामभरोसे कशी काय असू शकते यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
हेही वाचा - वर्ध्यात जंगली जनावरांनी केले पिकांचे नुकसान