महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात चोरट्यांनी चक्क एटीएम पळवले, रक्कम पाहून बसला धक्का - वर्धा जिल्हा बातमी

सेवाग्राम पोलीस ठाण्यांतर्गत सेवाग्राम आश्रमकडे जाणाऱ्या मार्गावरील चौकात टाटा प्रोडक्ट्स इंडिकॅशचे एटीएम आहे. यात 2 मशीन असून यातील 1 मशीन चोरट्यांनी गाडीमध्ये टाकून चोरून नेले.

thieves stole ATM
वर्ध्यात चोरट्यांनी चक्क एटीएम पळवले

By

Published : Jan 2, 2020, 7:49 AM IST

वर्धा- सेवाग्राम पोलीस ठाण्यांतर्गत वर्षातील पहिलाच गुन्हा एटीएम मशीन चोरीचा दाखल करण्यात आला आहे. सेवाग्राम चौकातील टाटा प्रोडक्ट्स इंडिकॅशचे एटीएम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या एटीएम मशीनमध्ये केवळ 12 हजार रुपये शिल्लक होते.

चोरट्यांनी चक्क एटीएम पळवले

हेही वाचा - समृद्धी महामार्ग : कंत्राटदार कंपनीला 239 कोटीचा दंड

सेवाग्राम पोलीस ठाण्यांतर्गत सेवाग्राम आश्रमकडे जाणाऱ्या मार्गावरील चौकात टाटा प्रोडक्ट्स इंडिकॅशचे एटीएम आहे. यात 2 मशीन असून यातील 1 मशीन चोरट्यांनी गाडीमध्ये टाकून चोरून नेले. यावेळी चोरांनी लगतच्या एका टायर पंचरच्या दुकानातील जुने टायर टाकून मशीन ओढून गेटजवळ आणले. त्यांनतर एटीएम वाहनात टाकून नेले, असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा - नववर्षाची पार्टी बेतली जिवावर, विहिरीत पडून दोघांचा मृत्यू

चोरांनी चोरी झाल्यानंतर या ठिकाणच्या सीसीटीव्हीचा डिव्हीआर पळवला आहे. पोलिसांनी श्वान पथक बोलावत शोधमोहीम सुरू केली. याप्रकरणी एसडीपीओ पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक निलेश ब्राह्मणे, सेवाग्राम ठाणेदार कांचन पांडे, यांच्यासह एपीआय महेंद्र इंगळे, आशिष मोरखडे, पोलीस उपनिरीक्षक चेतन बोरखडे यांच्यासह पोलीस कर्मचारी इम्रान खिलची, अमर लाखे यांनी तपास मोहीम सुरू केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details