वर्धा - अगोदरच पेट्रोल दरवाढ होऊन मागील काही दिवसांत दराने शंभरी गाठली आहे. यामुळे भुरट्या चोरट्यांची नजर आता पेट्रोल टॅंक भरून असणाऱ्या दुचाकीवर पडली आहे. हाच पेट्रोल चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. वर्ध्याच्या सावंगी येथील शिवनेरी फोर्ट लेआऊट परिसरातील हॅपी टॉवरमधील ही पेट्रोल चोरी कैद झाली आहे.
वर्ध्यात चोरांनी चोरले पेट्रोल मागील काही दिवसांमध्ये एका लिटर पेट्रोलसाठी शंभरची नोट मोडावी लागत आहे. यात 97 ते 98 रुपये पेट्रोल असल्यानं थेट शंभर रुपयांचे पेट्रोल भरावे लागत आहे. यामुळे भुरट्या चोरट्यांचा मोर्चा दुचाकीकळे वळला आहे. रात्रीच्या सुमारास पार्किंगमध्ये किंवा शांत ठिकाणी असणाऱ्या दुचाकीमधून दोघांनी पेट्रोल चोरून नेलेत. ही पेट्रोल चोरीची घटना सीसीटीव्ही कैद झाल्याने लॉकडाऊनमध्ये भुरट्या चोरट्यांनी हा नवीन उद्योग सुरु केला की काय याचा प्रश्न पडला आहे. रामनगर, बोरगाव यासह इतर परिसरात रात्रीच्या सुमारास वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या दुचाकी वाहनातून पेट्रोल चोरीच्या घटना मागील काही दिवसांत वाढलेल्या आहे. अश्याच पद्धतीने हॅप्पी टॉवरमध्ये रात्रीच्या सुमारास दोन चोरट्यानी दुचाकीच्या वाहनातून पेट्रोल काढण्यासाठी आले. यात सुरवातीला त्यांनी दुचाकीत पेट्रोल आहे का नाही ही याही खात्री करून घेतली. त्यानंतर हातातील प्लास्टिकमधून रिकामी बॉटल काढुन पेट्रोल काढायला सुरवात केली. तेच दुसरा मात्र कोणी आल्यास पळण्यासाठी पाळत ठेवताना दिसून आले. पेट्रोल चोरणाऱ्या चोरट्यानी कोणाला ओळख पटू नये म्हणून तोंडावर कपड्यांनी बांधले होते. यात अनेकांच्या दुचाकीतील पेट्रोल चोरी जात असल्याचे काहींच्या निदर्शनास आले. यात टॉवर मधील एकाच्या दुचाकीतील 600 रुपयाचे पेट्रोल टाकले असतांना ते रात्रीतून काढल्याने ही बाब लक्षात आली. यामुळे पेट्रोल चोरी करणाऱ्या चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेण्यात आली. अखेर हा चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. पण चेहऱ्याला काळे कापड बांधल्याने ओळख पटण्यास अडचण जात आहे. पण अखेर पेट्रोल चोर सीसीटीव्हीत कैद झाल्याने नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. याचा फायदा त्या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.