वर्धा -हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात सलग तीन-तीन दिवस खटल्याचे कामकाज चालले. या प्रकरणी आतापर्यंत 13 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. यामध्ये 13वे साक्षीदार हे कबुली पंचनाम्याचे पंच असून त्याची बचाव पक्षाकडून उलट तपासणी होणे बाकी आहे. 20 मार्चला त्यांची साक्ष होणार आहे. 5 एप्रिलला 14वा साक्षीदार न्यायालयात हजर होणार आहे.
कबुली पंचांची साक्ष महत्त्वाची -
बुधवारी (17 फेब्रुवारी)ला सुनावणीच्या तिसऱ्या दिवशी प्रकरणातील ५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये नागपूर येथील शवविच्छेदन करणारे डॉक्टर, हिंगणघाट उपजिल्हा रुग्णलायत पीडितेवर प्राथमिक उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी, पीडितेची मैत्रीण व पीडितेच्या महाविद्यालयातील दोन विद्यार्थीनीची साक्ष नोंदवण्यात आली. यातील कबुली पंच यांची 20 तारखेला साक्ष होणार आहे. 20 तारखेला सरकारी वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित राहणार नसून केवळ बचवपक्षाकडून उलटतपासणीचे कामकाज न्यायालयात चालणार आहे. कबुलीनामा लिहिणाऱ्यांची आणि जप्ती पंचनामा करणाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरणार असल्याचे दोन्ही बाजूंच्या वकिलांनी सांगितले.