वर्धा -कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याचा परिणाम अनेक पर्यटनस्थळांवर झालेला दिसत आहे. वर्ध्याच्या सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमात सुद्धा याचा परिणाम दिसून आला. आश्रमाला भेट देणाऱ्या पर्यटकांची गर्दी रोडावली आहे.
लोकांनी पर्यटनस्थळी गर्दी करू नये असे, आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. प्रतिबंधत्मक उपाययोजनेचे दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कोरोनाच्या शिरकावानंतर शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिल्याने येणाऱ्या ट्रिपही बंद झालेल्या आहेत.