वर्धा -वर्ध्यात आता रेमडेसिवीर नंतर 'एम्फोटेरेसिन - बी' हे इंजेक्शजन निर्माण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या फूड आणि ड्रग विभागाने हे इंजेक्शन निर्माण करण्यासाठी एमआयडीसीमधील जेनेटिक लाइफ सायन्सला परवानगी दिली आहे. यामुळे अवघ्या 1200 रुपयांत हे इंजेक्शन मिळणार असून, रोज जवळपास 20 हजार व्हायल्स तयार होणार आहेत. यामुळे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने रेमडेसिवीर इंजेक्शन निमार्ण करण्यासाठी वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्स या कंपनीला परवानगी मिळला होती. यात रेमडेसिवीरच्या 17 हजार व्हाल्सची पहिली खेप मिळाली असतानाच आता दुसऱ्या दिवशी एम्फोटेरेसिन इंजेक्शन निर्माण करण्याची देखील परवानगी मिळाली आहे.