वर्धा- वर्ध्यात मध्यरात्री दोन माथेफिरूंनी सुमारे 12 चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्याची ( Car's Broken Glass ) घटना उघडकीस आली. शुक्रवारच्या मध्यरात्री शहरातील विघ्नहर्ता नगर आणि म्हाडा कॉलनीमध्ये घरासमोर उभ्या असलेल्या वाहनावर दगडाने काचाची तोडफोड करत नुकसान करण्यात आले. दुचाकीवर आलेल्या दोघांनी हा प्रकार केल्याचे स्थनिक नागरिकांकडून सांगितले जात आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Car's Broken Glass : अज्ञात माथेफिरुचा धुमाकूळ, वर्ध्यात मध्यरात्री 12 कारच्या फोडल्या काचा - म्हाडा कॉलनी वर्धा
शहरातील म्हाडा कॉलनी तसेच विघ्नहर्ता नगर परिसरातील मध्यरात्री काहीतरी तुटल्याचा आवाज स्थानिक नागरिकांना आला. मात्र काय फुटले याचा अंदाज आला नाही. पण, सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली. एक दोन लोकांसोबत नाही तर सुमारे 12 वाहनाच्या काचा फोडल्याचे समोर आले.
शहरातील म्हाडा कॉलनी ( Mhada Colony Wardha ) तसेच विघ्नहर्ता नगर परिसरातील मध्यरात्री काहीतरी तुटल्याचा आवाज स्थानिक नागरिकांना आला. मात्र काय फुटले याचा अंदाज आला नाही. पण, सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली. एक दोन लोकांसोबत नाही तर सुमारे 12 वाहनाच्या काचा फोडल्याचे समोर आले. त्यामुळेच परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस विभागाकडे माथेफिरु गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
दोन वर्षांपूर्वी म्हाडा कॉलनी परिसरात असाच प्रकार घडला होता. काहींनी चारचाकी वाहनाच्या काचा फोडून दुचाकीचीही तोडफोड केली होती. याचीच पुनरावृत्ती झाली आहे. काचा फोडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण रामनगर पोलिसांना माहिती देऊनही घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने नगरसेवक निलेश किटे यांनी नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.