वर्धा - शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी. तसेच यापुर्वीच्या सरकारने नव्या पेन्शनसाठी नेमलेली समिती रद्द करावी, या मागणीचे निवदेन शिक्षक महासंघाने खासदार सुप्रिया सुळेंना दिले. यावेळी त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणार असल्याचे आश्वासन सुळेंनी दिले.
शिक्षक महासंघाचे खासदार सुप्रिया सुळेंना निवेदन - शिक्षक महासंघ वर्धा
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी. तसेच यापुर्वीच्या सरकारने नव्या पेन्शनसाठी नेमलेली समिती रद्द करावी, या मागणीचे निवदेन शिक्षक महासंघाने खासदार सुप्रिया सुळेंना दिले. यावेळी त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणार असल्याचे आश्वासन सुळेंनी दिले.
शिक्षक महासंघाचे खासदार सुप्रिया सुळेंना निवेदन
शिक्षक महासंघाने जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासंबंधी वारंवार लढा दिला आहे. मात्र, या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. शिक्षकांसह सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर कराव्यात. कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावेत. शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करावीत अश्या मागण्याही करण्यात आल्या आहेत.
TAGGED:
शिक्षक महासंघ वर्धा