वर्धा - महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील प्रकारावर तापलेले वातावरण पाहता विद्यापीठ प्रशासनाने कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. या बैठकीत सहा विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेतले. यात विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्याचा विचार करता हे निलंबन मागे घेण्यात आले, असे सांगण्यात येत आहे. शिवाय यात संबंधित घटनेतील विद्यार्थ्यांचा शोध घेऊन यात एक समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा -एफएटीएफ : पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा काळ!
विद्यार्थ्यांनी आजच्या देशातील विविध विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सामूहिक पत्र लेखन करून कांशीराम यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्याची परवानगी मागितली होती. यात विद्यापीठ प्रशासनाने आचारसंहिता सुरू असल्याने सामूहिक पत्र लेखनाची परवानगी देता येणार नाही, असे सांगत नकार देण्यात दिला. त्यांनी कांशीराम यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्याची परवानगी मागितली नाही, असेही सांगण्यात आले होते. यावर परवानगी नाकारली असताना सामूहिक धरणे देत केलेला प्रकार आचारसंहिता तसेच विद्यापीठ प्रशासना शिस्त भंग करणारा असल्याने निलंबनाची करवाई केली, असे सांगण्यात आले होते.