महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड : 'हे' मंत्री महोदय करणार लाक्षणिक उपोषण - सुनील केदार बातमी

महिलांचा सन्मान ही भावना समाजात रुजली पाहिजे. हा विचार घेऊन मी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती सुनील केदार यांनी दिली.

sunil-kedar
सुनील केदार, पशु संवर्धन मंत्री पालकमंत्री

By

Published : Feb 7, 2020, 12:20 PM IST

वर्धा-महिलांचा सन्मान ही भावना समाजात रुजली पाहिजे. हा विचार घेऊन मी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे. उपोषणाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांनी सांगितले आहे. ते वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत आले असता, वर्ध्यातील जळीतकांड प्रकरणावर बोलत होते.

सुनील केदार, पशु संवर्धन मंत्री पालकमंत्री

हेही वाचा-संतापजनक ! चंद्रपूरात आजोबाकडून सात वर्षीय नातीचे लैंगिक शोषण

हिंगणघाट येथील तरुणीवर झालेला पेट्रोल हल्ला हा दुर्दैवी आहे. ती पीडित मुलगी जीवंत राहावी आणि पुढील आयुष्य तिला सन्मानाने जगता यावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मात्र, कोणीही कायदा हाती घेऊ नये, असेही सुनील केदार यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details