वर्धा -कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासकीय पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. काही ठिकाणी नागरिक सहकार्य करत आहेत. मात्र, काही हौशी लोकांविरोधात कठोर पावले उचलावी लागत आहे. उपविभागीय अधिकरी हरीश धार्मिक यांनी प्रशासकीय उपाययोजनांबद्दल माहिती दिली आहे. तसेच आतापर्यंत प्रशासनाने केलेल्या कारवाई संदर्भात त्यांनी माहिती दिली.
भाजी बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी शहरातील शाळांच्या मैदानावर बाजार भरवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये गांधी विद्यालय, कन्या शाळा, मॉडेल हायस्कूल, कन्नमवार हायस्कूल आणि सहकार मंगल कार्यालयाचे मैदान यांचा समावेश आहे. मोठ्या मैदानामुळे सोशल डिस्टन्सिंगसाठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.