वर्धा- हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची प्रकृती अजूनही गंभीर असली तरी स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या तरुणीवर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे यामधील पीडितेला वाचव, अशी देवाकडे प्रार्थना येथील कंप्यूटर प्रशिक्षण विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली आहे.
देवा 'तिला' वाचव, वर्ध्यात विद्यार्थ्यांची प्रार्थना हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : 'त्याने' तिला जाळण्याची आधीच केली होती तयारी; सोबत बॉटल, टेंभा, कपडे अन् बरंच काही...
सध्या पीडिता अतिदक्षता विभाग (आयसीयू) मध्ये आहे. पुढच्या 48 तासानंतर तिला अन्न देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.
बुधवारी पीडितेला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले होते. तिथे तिचे ड्रेसिंग करण्यात आल्याचे देखील डॉक्टरांनी सांगितले. पीडितेला श्वास घ्यायला होत असलेला त्रास कमी होत आहे. तसेच संक्रमण (इन्फेक्शन) होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. पीडितेच्या गळ्यात सूज असल्याने ती सध्या बोलू शकत नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे ती लवकरात-लवकर बरी व्हावी, यासाठी सर्वजण देवाकडे प्रार्थना करत आहेत.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड: आरोपीचे वकीलपत्र न स्वीकारण्याचा वकील संघाचा निर्णय