महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बापूंना आदरांजली...!  वर्ध्याच्या मगन संग्रहालयात विद्यार्थ्यांनी केली सूतकताई

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्ताने मगन संग्रहालय वर्धा येथे 'सूत यज्ञ २०२०' चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात २४ शाळेतील ५०० विद्यार्थ्यांनी सूत कताई करून बापूंना श्रद्धांजली वाहिली.

मगन संग्रहालयात महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त 'सूत यज्ञ २०२०' कार्यक्रमाचे आयोजन
मगन संग्रहालयात महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त 'सूत यज्ञ २०२०' कार्यक्रमाचे आयोजन

By

Published : Jan 31, 2020, 8:21 AM IST

Updated : Jan 31, 2020, 9:26 AM IST

वर्धा -येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी मगन संग्रहालयात 'सूत यज्ञ' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील २४ विविध शाळांमधील ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी टकळीवर सूत कताईच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. गांधींच्या जयंतीचे १५० वे वर्ष असतानाच सूत यज्ञाचे हे पाचवे वर्षपर्व होते.

मगन संग्रहालयात महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त 'सूत यज्ञ २०२०' कार्यक्रमाचे आयोजन

यामध्ये 24 शाळेतील तब्बल ३ हजार विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. यात आज जवळपास ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या सूत कताईतून १२ मीटर कापड तयार करण्यात आला आहे. यात नागपूर, सिंदी, केळझर, सेलू, अल्लीपूर, समुद्रपूर, शिरूळ, येळाकेळी, देवळी, सालोड, येरणवाडी, आंजी, मांडवा या शाळांतील विद्यार्थ्यांनी सूत यज्ञात सहभाग घेतला.

या ठिकाणी बसून असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हे टकळीवर कापसापासून धागा तयार करण्यात गुंतले होते. नामशेष होत चाललेल्या सूत कताईला नवीन रूप देण्याचे काम या संग्रहलयाच्या वतीने ५ वर्षापासून सुरू आहे. सूत कताईतून धागा तयार करणे दिसायला जरी सोपे वाटत असला तरी हे काम तेवढे सोपे नाही. या टकळीवर होणाऱ्या सूत कताईमधून विद्यार्थ्यांना श्रम आणि प्रातिष्ठेच धडे दिले जातात. तसेच या टकळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकतेची शिकवण दिली जाते. या निमित्याने एक कागदावर एकत्रपणे येऊन सही करून एकतेचे रुप असा संदेश साकरण्यात आला.

हेही वाचा - महात्मा गांधीची हत्या केली पण त्यांचे विचार कसे मारणार?

या उपक्रमाला जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी भेट दिली. महान कार्याला, स्वातंत्र्याच्या लढ्याच्या इतिहास समजून घेण्यासाठी महात्मा गांधी यांना समजून घेणे महत्वाचे असल्याचे यावेळी ते म्हणाले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी भीमनवार, आचार्य बाळकृष्ण, विभा गुप्ता उपस्थित होत्या. तसेच यात सहभागी शाळेचे विद्यार्थी त्यांचे शिक्षक आणि स्वयंसेवक उपस्थिती होते.

हेही वाचा - 'स्त्रियांच्या असुरक्षिततेमागचे कारण म्हणजे दारू'

Last Updated : Jan 31, 2020, 9:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details