वर्धा - रविवारी विविध केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. यामध्ये दुपारच्या सत्रातील पेपरची वेळ दोन वाजताची होती. यासाठी वीस मिनिट अगोदर परीक्षा केंद्रावर पोहचणे गरजेचे होते. वर्ध्याच्या न्यु इंग्लिश स्कुल येथील केंद्रावर 30 ते 40 परीक्षार्थीना प्रवेश नाकारण्यात आला आहे. हा परीक्षा निश्चित वेळेच्या अगोदरच पोहचून नाकारण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तर केंद्र प्रमुखांकडून परीक्षार्थी उशिरा परिक्षा केंद्रावर दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्य शिक्षक पात्रता परीक्षा वर्ध्यातील चार केंद्रावर घेण्यात आली. यात सकाळच्या सत्रात पेपर-1 परिक्षा पार पडली. यामध्ये पेपर एकसाठी 1566 विद्यार्थी परिक्षेत बसले. तेच दुसऱ्या पेपर साठी 1248 विद्यार्थी प्रवेशित होते. दरम्यान, न्यु इंग्लिश स्कुल येथील केंद्रावर काही विद्यार्थी पोहचले असता त्यांना आतमध्ये घेतल्या गेले नाही. यावेळी 1 वाजून 40 मिनीटांनी पोहचले. पण प्रत्यक्षात 1.30 वाजताच परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. सर्वाना माहिती देऊनही परिक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.