महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मालगाडीच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू, रेल्वे रूळ ओलांडताना अपघात - wardha police news

पुलगाव येथील रेल्वेचे गेट बंद असल्याने रुळ ओलांडताना मालगाडीच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही घटना पुलगाव रेल्वे क्रासिंगवर गुरूवारी दुपारी घडली.

student died in a train collision in Wardha
मालगाडीच्या student died in a train collision in Wardha धडकेत विद्यार्थीनीचा मृत्यू

By

Published : Jan 9, 2020, 8:33 PM IST

वर्धा - पुलगाव येथील रेल्वेचे गेट बंद असल्याने रुळ ओलांडताना मालगाडीच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही दुःखद घटना पुलगाव रेल्वे क्रॉसिंगवर गुरूवारी दुपारी घडली. अंकिता गायधने वय 20 वर्ष असे मृत विद्यार्थिनींचे नाव असून ती पुलगावच्या वल्लभ नगर येथील रहवासी होती.

मालगाडीच्या धडकेत विद्यार्थीनीचा मृत्यू

पुलगाव येथील रेल्वे क्रॉसिंगवर एक मालगाडी उभी असल्याने गेट बंद होते. यावेळी अंकिता सायकलने शाळेकडून घराकडे जात होती. यावेळी अंकिता रेल्वे पटरी ओलांडत होती. तेच अचानक पुलगावकडून धामणगावच्या दिशेने जाणारी दुसरी मालगाडी आली. अंकिताला मालगाडीची जोरदार धडक बसली. ती फेकली गेल्याने गंभीर जखमी होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पुलगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. यावेळी मोठ्या संख्यने बघ्यांची गर्दी पाहायला मिळाली. जीआरपीने घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास पीएसआय अश्विन गजभिये यांच्या मार्गदर्शनात किशोर दाभाडे करत आहे.

रेल्वे पुलाच्या रखडलेल्या कामाचा बळी -

पुलंगाव येथील रेल्वे गेट शहराच्या मध्यभागी आहे. यामुळे नागरिकांना लांबून दुसऱ्या मार्गाने प्रवास करावा लागतो. यावेळी लहान मुलं शाळकरी विद्यार्थ्यांना फिरून जाण्याऐवजी हा धोकादायक पर्याय निवडतात. तेच वाहनधारक दुसऱ्या मार्गाने निघून जातात. यासाठी उड्डान पुलही मंजूर झाला आहे. पण अनेक महिन्यांपासून पुलाचे काम रखडले आहे. यामुळे हा जीवघेणा प्रवास अनेक विद्यार्थी रोज करतात. याच रखडलेल्या कामाचा बळी अंकिता ठरली.

ABOUT THE AUTHOR

...view details