वर्धा :पवन दहाव्या वर्गात शिकतो. त्याच्या कुटूंबात आई, भाऊ आहे. मात्र त्याचे बाबा नाहीत, पवन 75 टक्के दिव्यांग आहे. पण तरीही पवनने शिक्षणाची जिद्द व चिकाटी सोडली नाही. तो रोज शाळेमध्ये येतो, न चुकता येतो. त्याला चालता येत नाही, लिहिता फारसं येत नाही. परंतु त्याला लिहिण्यासाठी त्याला कोणतीही वस्तू देण्यासाठी त्याचे मित्र त्याला खूप जास्त मदत करतात. त्याला घरून व्हीलचेअरवरून शाळेमध्ये आणतात, शाळेमध्ये सुद्धा त्याला कुठेही घेऊन जायचे असले, तर त्याला मित्र सारंग टर्के हा खूप मदत करतो.
सारंग करतो पवनला मदत : सारंग पवनला कुठेही घेऊन जातो. त्याला वॉशरूमला घेऊन जाण्यासाठी तो त्याला उचलून घेऊन जातो. अगदी लहान मुलासारखे तो त्याची काळजी करतो. पवनचे वडील हे पवन सहा महिन्याचा असताना त्यांनी आत्महत्या केली होती. त्याच्या आईचे सांगण्यावरून पवनच्या वडिलांना ब्रेनचा त्रास होता. त्याच तासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. त्यावेळी पवन सहा महिन्याचा होता व त्याचा मोठा भाऊ उदय हा अडीच वर्षाचा होता. मोठ्या कष्टाने त्याच्या आईने दोघांनाही वाढवले. आता पवनचा मोठा भाऊ हा आयटीआय करत आहे. त्याची आई ही मजुरी काम करते. हे सर्व कुटुंब त्याच्या आजोबाच्या घरी राहते. त्याचे आजोबा ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी आहे.