वर्धा -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कडक निर्भंधांना मुद्दतवाढ देण्यात आली आहे. हे निर्बंध 8 मे पासून 13 मेच्या सकाळपर्यंत लागू असणार आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या अजून आटोक्यात न आल्याने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आणखी पुढील पाच दिवस जिल्ह्यात कडक निर्बंध असणार आहेत. यामध्ये अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडण्यास बंदी आहे. या सोबतच अत्यावश्यक सेवा घरपोच देणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असणार आहे.
हेही वाचा -घराच्या खोदकामात सापडले मोगलकालीन सोन्याचे शिक्के, दागिने
या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा विचार होत नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींना समोर जावे लागत असल्याने याकडेही लक्ष देण्याची मागणी प्रहार सोशल फोरमचे सस्थापक अध्यक्ष बाळा जगताप यांनी दिली. शेतातील कामे सुरू असताना पेट्रोल डिझेल मिळणे बंद असल्याने ट्रॅक्टरच्या सहायाने होणारी कामे थांबली आहेत. शेतात चवळी, टमाटर, ढेमूस या सारखे पीक खराब होत चालले आहेत, याचाही विचार होणे गरजेचे, असल्याचे बाळा जगताप म्हणाले.
काय सुरू, काय बंद?
- दूध संकलन, वितरण सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत सुरू असणार.
- अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडण्यास बंदी.
- किराणा, भाजीपाला, फळ, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्यपदार्थ सर्व दुकाने बंद राहणार. सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत घरपोच सेवा देता येणार, ग्राहकांना दुकानात जाता येणार नाही.