महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग्रीन झोन असलेल्या वर्ध्यात धावली 'लालपरी'

42 दिवसांच्या लॉकडाऊननंतर वर्ध्यात बससेवेला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात 25 बसेस सोडण्यात आल्या आहेत. वर्धा बस स्थानकासह जिल्ह्यातील इतर काही बस स्थानकांतून या बसेस सोडण्यात आल्या.

Bus
बस

By

Published : May 6, 2020, 1:48 PM IST

Updated : May 6, 2020, 2:46 PM IST

वर्धा -ग्रीन झोनमध्ये असलेल्या वर्ध्यात आजपासून लालपरीची चाके फिरायला लागली आहेत. 42 दिवसांच्या लॉकडाऊननंतर वर्ध्यात बससेवेला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात 25 बसेस सोडण्यात आल्या आहेत. वर्धा बस स्थानकासह जिल्ह्यातील इतर काही बस स्थानकांतून या बसेस सोडण्यात आल्या.

42 दिवसांच्या लॉकडाऊननंतर वर्ध्यात बससेवेला सुरुवात झाली

प्रत्येक बसमध्ये असणार सोशल डिस्टन्सिंग -

ग्रीन झोनमध्ये असल्याने जिल्ह्यात बस गाड्या सुरू झाल्या असल्या तरी यात सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझेशनची व्यवस्था असणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंतच्या वेळेत बस सुटणार आहेत. ही वाहतूक जिल्हांतर्गतच असणार आहे. वर्धा विभागात 273 बस आहेत. प्रशासनाच्या निर्देशानुसार 50 टक्के बस विविध मार्गावर धावतील. सध्या नागरिकांना माहित नसल्याने गाड्यांमध्ये गर्दी नव्हती, असे विभागीय नियंत्रण चेतन हसबसनिस यांनी सांगितले.

Last Updated : May 6, 2020, 2:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details