वर्धा- सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांचे ई-लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते काल (२ सप्टेंबर) पार पडले. गांधी जयंतीचे औचित्य साधून अर्धवट कामे असताना देखील लोकार्पण केल्याचा आरोप भाजपचे आमदार पंकज भोयर आणि खासदार रामदास तडस यांनी केला आहे. तसेच, रीतसर निमंत्रण नासल्याचे सांगत दोन्ही जन प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे.
वर्ध्यात महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी भंगार सहित्यापासून तयार शिल्पाचे आणि सेवाग्राम विकास आराखड्यातील जवळपास १६२ कोटींच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले. मंजूर कामांचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. यात दोन स्क्रॅप शिल्प तसेच शहरातील चौकांचे गांधीयन थीमवर सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. यासह सेवाग्रामचे यात्री निवास, वीआयपी निवसस्थान, पार्किंग व्यवस्था, पवनार येथील धाम नादीच्या तिरावरील मूर्ती विसर्जनाचे काम करण्यात आले आहे. यातले काही कामाचे लोकार्पण झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता टाके यानी दिली. पण, सत्ता राहील की नाही, या भीतीपोटी मुख्यमंत्र्यांनी हे लोकार्पण केल्याचा आरोप खासदार तडस यांनी केला.