महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कंटेनरची एसटी बसला धडक; दोन्ही चालक जखमी - जखमी

धडकेत चालकाचा बाजूचा भाग पूर्णतः दबला गेला. अपघातात बसचालक इक्बाल झावरे आणि कंटेनर चालक निसार अहमद खान यांच्या डोक्याला मार लागला आहे.

बस कंटेनर धडक

By

Published : May 21, 2019, 4:50 PM IST

वर्धा- तळेगाव येथून मोर्शीला जाणाऱ्या एसटी बसचा आणि कंटेनरचा देवगाव फाट्याजवळ अपघात झाला आहे. दोन्ही चालक डोक्याला मार लागल्याने जखमी झाले आहेत.

सकाळच्या सुमारास तळेगाव आगाराची बस क्रमांक (MH-४० Y ५२७८) मोर्शीकडे जात होती. आष्टीकडून येणारा कंटेनर क्रमांक (NL- ०१, N-९८०२) तळेगावच्या दिशेने येत होता. दरम्यान, देवगाव फाट्याजवळ भरधाव कंटेनरने बसला धडक दिली. यामध्ये बसचालकाने प्रसंगावधान दाखवत स्वत:चे पाय वाचवले. या धडकेत चालकाचा बाजूचा भाग पूर्णतः दबला गेला. अपघातात बसचालक इक्बाल झावरे आणि कंटेनर चालक निसार अहमद खान यांच्या डोक्याला मार लागला आहे.

बस कंटेनर धडक

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरिक्षक धीरज राजूरकर हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details