वर्धा- आईने 200 रुपये न दिल्याने रागाच्या भरात गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना पंजाब कॉलनी येथे गुरुवारी सायंकाळी घडली. सर्वेश इंगळे असे 19 वर्षीय तरुणाचे नाव आहे. रामनगर पोलिसात घटनेची नोंद असून तपास सुरू आहे.
सर्वेशचे वडील गडचिरोली पोलीस दलात कार्यरत आहेत. ते कामांमुळे अनेक दिवसापासून तिकडे अडकून आहेत. मुलाने गुरुवारी सकाळी आईला 200 रुपयाची मागणी केली. यावेळी आईने नेहमी नेहमी पैसे मागत असल्याने देण्यास नकार दिला. यावरून सर्वेशने कड्याक्याचे भांडण केले. आईने पैसे न दिल्याने त्याने वडिलांना फोन लावला. यावेळी वडिलांनी सुद्धा त्याला नकार दिल्याने त्याने वडिलांवर सुद्धा राग व्यक्त केला. काही वेळानी वडील आशीर्वाद इंगळे यांनी मुलाला फोन लावून पैसे पाठवल्याचे सांगितले. पण त्याने मला पैसे नाही पाहिजे असे सांगून फोन ठेवला. रामनगर पोलिसांनी घटनेत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. यामध्ये 200 रुपये न दिल्याने रागाच्या भरात हे पाऊल उचलल्याची माहिती पुढे येत आहे. पुढील तपास सूरु आहे.