महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुलगावात पत्नीची हत्या करून सैनिकाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या? - पुलगाव सैनिक आत्महत्या बातमी

पुलगाव येथे दारुगोळा भांडारात अजय कुमार सिंग हा (मूळ बिहार राज्यातील रहिवासी) सैनिक कार्यरत आहे. बुधवारी मध्यरात्री पावनेदोन वाजताच्या सुमारास अजय कुमार सिंगने स्वतःच्या सर्व्हिस गनने पत्नीवर गोळी झाडली, त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडली. या आवाजाने कॅम्प परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

soldier commits suicide by killing his wife in pulgaon at wardha
वर्धा

By

Published : Jul 2, 2020, 10:00 AM IST

Updated : Jul 2, 2020, 10:34 PM IST

वर्धा - पुलगाव येथील दारूगोळा भांडारात राहणाऱ्या सैनिकाने पत्नीची गोळी घालून हत्या केली. त्यानंतर स्वतःला सुद्धा गोळी मारून घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अजय कुमार सिंग असे सैनिकांचे तर प्रियंका असे मृत पत्नीचे नाव आहे.

पुलगावात पत्नीची हत्या करून सैनिकाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या?

या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अजयसिंग हा मूळचा बिहार येथील आहे. बुधवारी रात्री तो ड्युटीवरून घरी आला. यानंतर त्याच्या घरातून गोळी झाडण्याचा आवाज आल्याने कॅम्प परिसरात खळबळ उडाली. कॅम्पच्या आतील परिसरात राहणाऱ्यांनी घराकडे धाव घेतली. यावेळी दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते. दोघांना लागलीच कॅम्प परिसरात असणाऱ्या सैनिकी रुगणलायत नेण्यात आले. यावेळी सैनिकांची पत्नी प्रियंका हिचा अगोदरच मृत्यू झाला होता. यात अजय कुमार याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सावंगी रुग्णलयात नेण्यात आले. पहाटे त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पुलगाव पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली असून दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला. नंतर फॉरेन्सिक चमूकडून आणखी काही माहिती मिळते का याची चौकशी केली जाणार आहे. घरात रक्ताचा सडा आणि साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांना ज्या बंदुकीने त्याने गोळीबार केला ती बंदूक मिळून आली. घटनेमागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. चौकशी सुरू असून लवकरच प्रकरणाचा उलगडा केला जाईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी दिली.

मृत महिला गरोदर?

मृत प्रियंकावर इंसास रायफलने गोळी झाडण्यात आली तेव्हा ती गरोदर असल्याची माहिती पुढे येत आहे. यावर पोलिसांनी अद्याप दुजोरा दिला नसून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर ही बाब स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले. नेमके कारण कुटुंबीय आल्यावर काही मिळते का या प्रतीक्षेत पोलीस आहे. कुटुंबीयांना घटनेची महिती देण्यात आले असल्याचे सगण्यात येत आहे.

हेही वाचा -सेलूत थांबवला बालविवाह, सहा महिन्यात पाच बालविवाह थांबवण्यात यश

Last Updated : Jul 2, 2020, 10:34 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details